सव्वा कोटींचा मालमत्ता कर थकविला : धुळ्यात बँक ऑफ महाराष्ट्रला लागले टाळे


Property tax of one and a half crores has been paid: Bank of Maharashtra in Dhule has been arrested धुळे : धुळ्यातील राजवाडे संशोधन मंडळाच्या मालकीची इमारतीत बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा असून 2011 पासून बँकेकडे मालमत्ता कर थकबाकीची रक्कम तब्बल एक कोटी 14 लाख 36 हजार 292 होवूनही बँकेने दखल न घेतल्याने बुधवार, 8 मार्च रोजी गल्ली क्रमांक चार येथील इमारतीला महानगरपालिकेने टाळे ठोकल्याने बँकेच्या ग्राहकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.

बँकेकडून तडजोडीस नकार
मालमत्ता करात तडजोड करण्याबाबत जिल्हा न्याय विधी मंडळातर्फे बँकेला नोटीसही बजावली होती पण तडजोडीस बँकेने नकार दिला होता. त्यामुळे महानगरपालिकेने पुन्हा नोटीस बजावली होती मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने महानगरपालिकेच्या वसुली पथकाने बँकेला बुधवारी टाळे ठोकले. वसुली अधीक्षक शिरीष जाधव, मधुकर वडनेरे, मुकेश अग्रवाल, सुनील गढरी, संजय शिंदे, अनिल सुडके, राजू गवळी, प्रदीप पाटील, अनिल जोशी, मधुकर पवार, अशोक मंगीडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !