धुळ्यात कॅफेआड तरुणाईचे अश्लील चाळे : पोलिसांच्या धाडीनंतर पळापळ
Cafes in Dhule : Indecent acts of youth : Escape after police raid धुळे : शहरातील देवपूरात झेड.बी. पाटील महाविद्यालय परीसरासह दत्त मंदिर परीसरात कॅफेंवर शुक्रवारी देवपूर पोलिसांनी एकाच वेळी धाडी टाकल्याने तरुणाईची पळापळ झाली तर कॅफेमध्ये चाळे करणार्या 45 महाविद्यालयीन तरुण-तरुणींना पोलिसांनी पकडत पोलिस ठाण्यात आणले. पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्यासमोर समज देऊन युवक-युवतींना सोडण्यात आले.
सात कॅफेवर एकाचवेळी कारवाई
सात कॅफेवर कारवाई करण्यात आली असून देवपूर पोलिसांची आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असून या कारवाईचे सर्वसामान्यांनी स्वागत केले आहे. वरीष्ठ अधिकार्यांनीही कारवाईचे कौतुक केले आहे. या कारवाईदरम्यान देवपूर पोलीस ठाण्याच्या बाहेर एकच गर्दी झाली. शुक्रवारी दिवसभर देवपूर पोलीस ठाण्याला यात्रेचे स्वरूप आले होते.
यांच्या पथकाने केली कारवाई
पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, आयपीएस रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोतीराम निकम, एपीआय सचिन बेंद्रे, महिला पीएसआय सी. जे. शिरसाठ, पीएसआय इंदवे, हेड कॉन्स्टेबल कचवे, विजय जाधव, पोलीस नाईक देवरे, वाघ, साळवे, थोरात, धोबी, खाटिक यांनी वेगवेगळ्या पथकात विभागून ही कारवाई केली.