एकनाथ खडसेंचा जळगाव जिल्ह्यातील विषय संपला : मंत्री गिरीश महाजनांची जोरदार टिका


Eknath Khadse’s issue in Jalgaon district is over : Minister Girish Mahajan’s strong criticism जळगाव  : जळगाव जिल्ह्यातून एकनाथ खडसेंचा विषय आता पूर्णपणे संपला असून त्यांचा अहमपणा त्यांना नडला आहे. स्वतःच्या मुलीला ते निवडून आणू शकले नाही, ग्रामपंचायतीत त्यांचा सदस्य नाही वा नगरपंचायतीतही सत्ता नाही त्यामुळे खडसे जोरात आपटले आहेत, अशी खरमरीत टिका मंत्री गिरीश महाजनांनी शनिवारी जळगावात केली. जळगाव जिल्हा बँकेत संजय पवार यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

खडसे तोंडावर आपटले
मंत्री महाजन म्हणाले की, खडसेंचा जो गैरसमज आहे की हा जिल्हा माझा, सहकार क्षेत्रात, दुध संघात, विधानसभेत, जिल्ह्यात आपणच आहोत हा त्यांचा अहमपणा होता मात्र आजच्या घडामोडीनंतर खडसे तोंडावर जोरदार आपटले आहेत. भाजपामध्ये खडसे म्हणायचे माझ्यामुळेच सर्व काही आहे मात्र आता ते राष्ट्रवादीत आहेत. मतदारसंघात ते मुलीला निवडून आणू शकले नाहीत शिवाय दुध संघात कुणीही निवडून आले नाही तर जिल्हा बँकेत मागे आम्ही निवडणूक लढवली नाही त्यामुळे आमच्यावर टिका करण्यात आली मात्र आता दुध संघातही ते निवडून येवू शकले नाहीत, ग्रामपंचायत वा नगरपंचायतीतही त्यांचा अध्यक्ष नाही त्यामुळे जिल्ह्यातून खडसेंचा विषय आता पूर्णपणे संपल्याचा दावा महाजनांनी केला.

पापाची फळे भोगावी लागणार
मंत्री महाजन म्हणाले की, हसन मुश्रीफांवर ईडीची कारवाई योग्यच आहे. तुम्ही बँका लुटल्यानंतर तुमच्या पापांची फळे तुम्हाला भोगावी लागणार आहेत. जे नियमाने आहे ते होतच राहणार आहे त्यामुळे यात राजकारण कुठेही नाहीत. ज्यांनी बँका लुटल्या त्यांच्यावर कारवाई ही होणारच, असेही महाजन म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !