रावेरला विश्वकर्मा नगरात वीज चोरी : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल


Power theft in Raverla Vishwakarma Nagar : Case registered against three यावल : रावेर शहरात राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने वीज चोरांविरोधात मोहिम राबवल्यानंतर तिघे आढळल्याने तिघांनो नोटीस बजावण्यात आली मात्र त्यानंतरही दंड भरण्यात न आल्याने त्यांच्याविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. रावेर शहरातील विश्वकर्मा नगरात तीन जण वीज चोरी करतांना आढळून आल्याने दंड अदा करण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली मात्र या तिघांनी दंड भरला नाही. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

वीज चोरांमध्ये कारवाईने खळबळ
रावेर येथील राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता दिलीप सुंदराणी यांच्यासह पथकाने शहरातील विश्वकर्मा नगर, शिक्षक कॉलनी भागात वीज चोरांविरुद्ध धडक मोहिम राबवली. या भागातील रहिवासी उमेश विश्वनाथ पाटील, भूषण सुभाष तायडे व सुरेश गोविंदा शिंदे हे तिघे वीज चोरी करताना आळढल्याने दंड भरण्याची नोटीस देण्यात आली मात्र दंड अदा न केल्याने यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !