सावद्यातील केळी व्यापार्याला असाही गंडा : एक ट्रक विक्रीच्या निमित्ताने दोन्ही विकल्या, एजंटासह गाडी मालकाविरोधात गुन्हा
Banana trader’s two trucks sold to each other : Crime against two including agent in Jalgaon जळगाव : केळी व्यापार्याच्या दोन ट्रकची जळगाव आरटीओ कार्यालयातील एजंटासह एकाने परस्पर विक्री करीत सात लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी मंगळवारी रामानंदनगर पोलिसात दोन संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
एक ट्रक विक्रीच्या नावाखाली दोन्ही विकल्या
रावेर तालुक्यातील सावदा येथील व्यापारी देविदास सीताराम राठोड (37, सावदा, ता.रावेर) हे केळी व्यापारी आहेत. त्यांच्याकडील टाटा कंपनीचा बारा टायर असलेला ट्रक (एम.एच.19 झेड.7055 व एम.एच.19 झेड.6955) हा जळगावातील आरटीओ एजंट शहादत अली यासीन अली (फैजपूर) याने 19 फेब्रुवारी 2023 रोजी ब्रिजेशकुमार प्रकाश यादव (सावदा) यांच्या नावे करून टाकला मात्र त्यापोटीची सात लाखांची रक्कम न देता फसवणूक केली. आपण एकच ट्रक विक्री केला असून दोन ट्रक वेगवेगळ्या नावावर दिसून आल्याने व्यापारी देविदास राठोड यांनी रामानंदनगर पोलिसात धाव घेतल्यानंतर संशयित आरोपी ब्रिजेशकुमार प्रकाश यादव (सावदा) व आरटीओ एजंट शहादत अली यासीन अली (फैजपूर) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील करीत आहेत.
