वेळेत जात प्रमाणपत्र सादर न केल्याचा फटका कंडारी ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक तायडे अपात्र
Sarpanch of Kandari Gram Panchayat Deepak Taide disqualified for not submitting caste certificate in time भुसावळ : तालुक्यातील कंडारी ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य दीपक रमेश तायडे यांनी विहित वेळेत जातप्रमाणपत्र सादर न केल्याने जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी त्यांना मंगळवारी अपात्र घोषित केल्याने कंडारीत खळबळ उडाली आहे. कंडारी सलीम सुपडू तडवी व सुवर्णा शांताराम सोनवणे यांनी जळगाव जिल्हाधिकार्यांकडे तायडे यांना अपात्र करण्याबाबत याचिका दाखल केली होती.
जिल्हाधिकार्यांनी केले अपात्र
तायडे हे 15 जानेवारी 2021 च्या निवडणुकीत अनुसूचित जमाती या प्रवर्गातून निवडून आल्यानंतर त्यांनी विहित वेळेत जातप्रमाणपत्र सादर केले नव्हते तर जात प्रमाणपत्र सादर करण्याचा अवधी हा 17 जानेवारी 2023 हा असताना तायडे यांनी प्रमाणपत्र सादर न केल्याने जळगाव जिल्हाधिकार्यांनी तक्रारदाराचा अर्ज मंजूर करीत तायडे यांना अपात्र केले.
