यावलला घंटागाडी बाजूला करण्याच्या कारणावरून एकास मारहाण
यावल : शहरातील बुरुज चौकामध्ये घंटागाडी बाजुला लावण्याच्या कारणावरून वाद झाल्याने घंटागाडी चालकास एकाने मारहाण केली. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
एकाविरोधात गुन्हा दाखल
शहरात बुरूज चौकामध्ये घंटागाडी घेऊन साहिल संतोष चव्हाण हा आला असता चौकात आवेश खान याने त्याला सांगितले की, घंटागाडी बाजूला घे खूप वास येत आहे. घंटागाडी चालकाने गाडी बाजुला घेतो असे सांगीतले मात्र यावरूनच वाद वाढल्याने साहिल चव्हाण यास आवेश खान याने मारहाण केली. या प्रकरणी यावल पोलिसात आवेश खान विरोधात गुन्हा दाखल करणयात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहेत.
