दरेगावात जुगाराचा डाव उधळला : 12 जुगारी कारवाईच्या कोठडीत


Gambling scheme foiled in Daregaon : 12 gamblers in custody चाळीसगाव : तालुक्यातील दरेगाव येथे उपखेड रस्त्यालगत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांच्या पथकाने धाड टाकत आठ जुगार्‍यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या तर चौघे पसार झाले. रोकडसह जुगारींच्या सहा दुचाकी मिळून चार लाख 83 हजार 630 रुपयांचा ऐवज बुधवारी जप्त करण्यात आला. या कारवाईने जुगार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या हद्दीत दरेगाव गावाच्या जवळ दरेगाव ते उपखेड रस्त्यालगत एका ठिकाणी वाहनांच्या आडोश्याला लाईटच्या उजेडात काही लोक गैरकायदा स्वत:च्या फायद्यासाठी झन्ना मन्ना नावाचा पत्याचा जुगार खेळत असल्याची माहिती चाळीसगाव उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंग देशमुख यांना मिळाल्यानंतर त्यांच्यासह संभाजी पाटील, राजेंद्र निकम, श्रीराम सांगवे, विश्वनाथ देवरे, राहुल जाधव, राहूल महाजन, महेश बागूल, मेहुणबारे पोलीस ठाण्याचे हवालदार मोहन सोनवणे, भूषण बाविस्कर अशांनी बुधवार, 12 रोजी पहाटे हा छापा टाकला. यावेळी आठ जणांना पकडण्यात आले तर चौघे पसार झाले मात्र अटकेतील संशयीतांकडून रोख रकमेसह सहा दुचाकी असा चार लाख 83 हजार 630 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

पोलिसांनी सांनी या कारवाईत निवृत्ती वाल्मीक माळी, प्रदीप नारायण पाटील,दगडू रंगराव बच्छे तिघेही रा. दरेगाव, प्रकाश झावराव जाधव, शरद परशुराम पगार,भरत भाऊसाहेब देवघट (तिघेही रा.देवघट, ता.मालेगाव), महेंद्र नाना सोनवणे (चिंचगव्हाण), कलीम मिराज सैय्यद (उंबरखेड) यांना ताब्यात घेतले तर विलास कैलास सोनवणे (दरेगाव), शुभम कोठारी (पूर्ण नाव माहित नाही, उंबरखेड), वासीम मोमीन (पूर्ण नाव माहित नाही, उंबरखेड), अमोल कसारे (पूर्ण नाव माहीत नाही, देवळी) हे पसार झाले आहेत. या प्रकरणी विश्वनाथ देवरे यांच्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !