भुसावळात तरुणाची करामत : एक टन भुईमूगाच्या शेंगा पाठवण्याच्या नावाखाली परप्रांतीयाला 75 हजारांचा गंडा


भुसावळ : एक टन भुईमुगाच्या शेंगा पाठवतो असे सांगून 75 हजार रुपयात फसवणूक करणार्‍या भुसावळातील संशयीताविरुद्ध येथील बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

ट्रेडिंग कंपनी असल्याचे भासवले
एका खाजगी एनजीओमध्ये व्यवसाय करणारे धरणी मुरलीधर (29, रा.धर्मराजा कोविल स्ट्रीट, चेतपेट, तिरूवन्नमलाई) यांच्याशी 1 फेब्रुवारी या दिवशी भुसावळ येथील राहुल देविदास चौधरी (सायली हॉटेलमागे, भुसावळ) याने मोबाईल वरून संपर्क साधून आपली देवेंद्र ट्रेडिंग कंपनी असल्याचे भासवत भुईमुगाच्या शेंगाचा पुरवठा करीत असल्याचे सांगत त्यापोटी अ‍ॅडव्हान्स म्हणून 75 हजार रुपये उकळले. गुगल पेद्वारे अ‍ॅडव्हान्स पाठवल्यावरही मला पेमेंट मिळाले नाही तसेचा उडवा-उडवीचे उत्तर देत माल पाठवण्यात आला नाही. याबाबत धरणी मुरलीधरण यांनी भुसावळ येथे येऊन खात्री केल्यानंतर कोणतीही कंपनी अस्तित्वात नसल्याचे लक्षात आाल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार जितेंद्र पाटील हे करीत आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !