खंडाळा गावातून 30 हजारांची दुचाकी चोरीला
A bike worth 30,000 was stolen from Khandala village भुसावळ : तालुक्यातील खंडाळा गावातून चोरट्यांनी 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकी चोरीचे सत्र कायम
युवराज पंढरीनाथ कंखरे (26, सुनसगाव, ता.भुसावळ) यांनी त्यांच्या मालकिची दुचाकी (एम.एच.19 सी.बी.9827) ही 12 रोजी खंडाळा गावातील जुन्या राजपूत समाज मंदिरासमोर लावली होती मात्र चोरट्यांनी संधी साधून दुचाकी लांबवली. हा प्रकार लक्षात आल्याने सर्वत्र दुचाकी शोध घेण्यात आला मात्र दुचाकी न आढळल्याने या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात कंखरे यांनी धाव घेत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुभान तडवी करीत आहेत.
