अंतुर्लीत बिअर बार फोडला : 45 हजारांचे साहित्य लंपास


Beer bar broken in Anturli : materials worth 45 thousand looted मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली गावाजवळील राज राजेश्वर बिअर बारमध्ये चोरट्यांनी चोरी करीत विदेशी दारूसह संगणक साहित्य आदी मिळून 45 हजारांचे साहित्य लांबवले. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

45 हजारांचे साहित्य लांबवले
अंतुर्ली फाटा ते इच्छापूर दरम्यान राज राजेश्वर परमीट रूम बिअरबार आहे. 11 ते 12 दरम्यान चोरट्यांनी बारच्या प्रवेशद्वाराचे शटर वाकवून सहा हजारांचे प्रिंटर, पाच हजारांचा डीव्हीआर, 12 हजारांचे सीपीयु मशीन, चार हजार 200 रुपये किंमतीची विदेशी दारू, पाचशे रुपये किंमतीची गल्ल्यातील चिल्लर आदी लांबवण्यात आली. या प्रकरणी हॉटेल मॅनेजर सिद्धार्थ दत्तू शिरतूरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास नाईक संतोष चौधरी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !