भरधाव दुचाकीच्या धडकेने कुर्‍ह्यातील दाम्पत्यासह तिघे जखमी : दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा


Three injured in collision with speeding two-wheeler: couple and three injured : Crime against two-wheeler भुसावळ : भरधाव दुचाकीने समोरून येणार्‍या दुचाकीस जबर धडक दिल्याने दाम्पत्यासह तरुण जखमी झाल्याची घटना मंगळवार, 11 रोजी सायंकाळी सात वाजता कुर्‍हा-वराडसीम रस्त्यावरील सागर बिअर बारजवळ घडली. या प्रकरणी दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

कुर्‍ह्यातील दाम्पत्यासह तरुण जखमी
तक्रारदार सुखदेव ओंकार भारूडे (48, कुर्‍हेपानाचे) हे पत्नी छाया यांच्यासह दुचाकी (एम.एच.19 सी.ए.4333) ने येत असताना संशयित किरण सुरेश निकम (कुर्‍हेपानाचे) याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (एम.एच.19 डी.सी.2040) द्वारे जोरदार धडक दिल्याने भारूडे दाम्पत्य जखमी झाले तसेच रोशन प्रभाकर साळी (24, कुर्‍हेपानाचे) हा तरुणही जखमी झाला तर दुचाकी जबर नुकसान झाले. दाम्पत्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून सुखदेव भारूडे यांनी दिलेल्या जवाबानंतर किरण निकम यांच्या विरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार युनूस शेख करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !