भुसावळसह बोदवड तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा
Bhusawal along with Bodwad taluka hit by stormy rain भुसावळ : भुसावळस बोदवड परीसराला शनिवारी सायंकाळी वादळी वार्यासह अवकाळी पावसाचा चांगलाच तडाखा बसला. आधीच वाढत्या उन्हाच्या तडाख्याने त्रस्त असलेल्या नागरीकांना काही वेळ चाललेल्या पावसामुळे मात्र गारवा मिळाला.
सखल भागात साचले पाणी
बोदवडसह परीसरात शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेनंतर वादळी वार्यासह विजांच्या कडकडाटात पावसाला सुरूवात झाली तर भुसावळसह परीसरात सायंकाळी सात वाजेनंतर अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. वादळी पावसामुळे लागलीच वीजपुरवठा खंडित करण्यात आला व तासानंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. पावसामुळे शेतातील चार्याचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
