भुसावळातील ‘त्या’ दोघा तरुणांवर गोळीबार पूर्व वैमनस्यातून : प्रकृती गंभीर, संशयीतांचा पोलिसांकडून कसून शोध
Firing on ‘those’ two youths in Bhusawal due to prior enmity : critical condition, thorough search by police for suspects भुसावळ : पूर्व वैमनस्यातून भुसावळातील दोघा तरुणांवर झालेल्या गोळीबाराने भुसावळ पुन्हा एकदा हादरले असून गुन्हेगारी पुन्हा ऐरणीवर आली आहे. साकरी-फेकरी रेल्वे उड्डाणपुलाजवळील रस्त्यावर भुसावळातील दोघा तरुणांवर गावठी कट्ट्यातून गोळीबार झाल्याची घटना घडल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणी शनिवारी सकाळी खडका, ता.भुसावळ येथील तिघा संशयीतांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गोळीबारानंतर पसार झालेल्या संशयीतांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.
ओव्हरटेक करीत महामार्गावर झाडल्या गोळ्या
सूत्रांच्या माहितीनुसार, अक्षय रतन सोनवणे (26, भुसावळ) व मंगेश अंबादास काळे (25, भुसावळ) व त्यांचे दोघे मित्र चारचाकी स्वीप्ट (एम.एच.19 डी.व्ही.0071) ने वरणगावकडे जेवणासाठी निघाल्यानंतर एकाच दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी त्यांचा रस्ता अडवला. यावेळी एका संशयीताने गोळी झाडल्यानंतर ती अक्षयच्या पोटाला तर मंगेशच्या छातीला लागली. अचानक झालेल्या घटनेनंतर तरुणांमध्ये प्रचंड खळबळ उडाली व ते जखमी अवस्थेत शेतात लपून बसले. यानंतर संशयित हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले.

पोलीस अधिकार्यांची धाव
शुक्रवारी रात्री अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, तालुका निरीक्षक विलास शेंडे, सहा.निरीक्षक प्रकाश वानखडे व सहकार्यांनी पाहणी केली. गोळीबार प्रकरणी धीरज प्रकाश सोनवणे (36, पाण्याच्या टाकीजवळ, खडक, ता.भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून खडका येथील तीन संशयीतांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
