बोदवड महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.माधव वराडे सेवानिवृत्त
बोदवड : बोदवड महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ.माधव वराडे नुकतेच सेवानिवृत्त झाले. संस्थेचे चेअरमन मिठूलालजी अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्राचार्य अरविंद चौधरी यांच्या उपस्थितीत त्यांना निरोप देण्यात आला.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष अजय जैन, अॅड.प्रकाशचंद सुराणा, श्रीराम बडगुजर, अशोक जैन, रवींद्र माटे, अॅड.प्रकाशचंद सुराणा, प्राचार्य अरविंद चौधरी, उपप्राचार्य डॉ. विनोदकुमार चौधरी, पर्यवेक्षक जे.एन.माळी यांची उपस्थिती होती. डॉ. माधव वराडे, त्यांच्या पत्नी सीमा वराडे व मुलगी स्मिता यांचा संस्थेचा वतीने आणि महाविद्यालयाच्या परीवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रातिनिधिक स्वरूपात डॉ.अजय पाटील, शेखरसिंग चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. मिठूलाल अग्रवाल यांनी वराडे यांच्या कार्यकाळात पुस्तकांची व वाचकांची संख्या वाढवली असल्याचे गौरवोद्गार काढले. प्रास्ताविक डॉ.गीता पाटील तर सूत्रसंचालन नरेंद्र जोशी, डॉ.रुपाली तायडे तर आभार डॉ.मनोज निकाळजे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे सर्व कर्मचार्यांनी सहकार्य केल्याचे प्रसिद्धीप्रमुख डॉ.रुपेश मोरे कळवतात.
