भुसावळात जागतिक नृत्यदिनानिमित्त ‘नृत्य संस्कार’


भुसावळ : नुपूर कथक डान्स अ‍ॅकेडमी व ब्राह्मण संघ यांचे वतीने जागतिक नृत्य दिनानिमित्त ‘नृत्य संस्कार’ हा शास्त्रीय व उपशास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन ब्राह्मण संघाच्या सभागृहात नुकताच झाला. कार्यक्रमाची सुरुवात डी.वाय.एस.पी.सोमनाथ वाघचौरे तसेच ब्राह्मण संघाचे अध्यक्ष विजय जोशी यांच्याहस्ते नटराज पूजन आणि दीपप्रज्वलन करून झाली. प्रास्ताविक नुपूर कथक डान्स अ‍ॅकॅडमीचे संचालक रमाकांत भालेराव यांनी करीत विविध उपक्रमांची माहिती दिली.

रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
किंजल बार्‍हे व लतिका श्रीखंडे यांनी ऋग्वेदातील दहाव्या मंडळातील शेवटचे सुक्त संगच्छध्व संवदद्धव या गीतावर नृत्य सादर केले. यानंतर अवनी धाडसे हिने सरस्वती वंदना सादर केली. या नंतर नीलम, किंजल बार्‍हे, लतिका श्रीखंडे, सीमा पाठक यांनी अहिर भैरव व ताल त्रितालमधील तराना सादर केला. नंतर हृदया सोनवणे, वृषाली लांडगे, मानवी नारखेडे, मनिशिका आरुषी, गार्गी पुसतकर, अक्षदा जाधव, मानवी पवार, लीशा महाजन यांनी रमस्तुती तर नीलम, किंजल बार्‍हे, लतिका श्रीखंडे, सीमा पाठक यांनी जटा जुट ही शिवस्तूती सादर केले. नंतर नुपूर भालेराव हिने मुरली मनोहर कृष्ण कन्हैय्या या गाण्यावर नृत्य सादर करून रसिकांची दाद मिळवली. या नंतर हिमांशू जावळे याने धमार ताल व कृश्ण स्तुती कथक नृत्यातून सादर केली. नंतर नृत्याशिक्षिका चारू भालेराव यांनी दादरा तालतील बिंदादिन महाराजांची ठुमरी कथक नृत्यातून सादर केली.नंतर मानसी भवते हिने अधरंम मधुरं हे जयदेव रचीत कृष्णभजन सादर केले. या नंतर किंजल बार्‍हे हिने मल्हार राहतील त्रिवट प्रकार सादर केला. लतिका श्रीखंडे हिने छम छम बाजे रे पायलिया या गाण्यावर तर किंजल बार्‍हे हिने नाचे मन मोरा या गाण्यावर नृत्य सादर केले. सर्व सादरीकरणाला रसिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. आभार पंकज जोशी यांनी मानले. यशस्वीतेसाठी संजय बोचरे, वैभव कुलकर्णी, मेघा कुलकर्णी, मालती श्रीखंडे, सुरेखा पांडव यांनी परीश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !