धुळ्यातील सहा निरीक्षकांसह तीन सहा.निरीक्षकांच्या बदल्या
शहर पोलिस ठाण्यात गणेश चौधरी तर शहर वाहतूक शाखेत राजकुमार उपासे रूजू
धुळे : धुळ्यातील सहा पोलिस ठाण्यातील निरीक्षकांसह तीन सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या जिल्हा पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी 14 रोजी केल्या आहेत. संबंधित अधिकार्यांनी बदलीच्या ठिकाणी तातडीने हजर व्हावे, असे आदेशात नमूद आहे.
या अधिकार्यांच्या झाल्या बदल्या
शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक गणेश नथ्थू चौधरी यांची धुळे शहर पोलिस ठाण्यात तर धुळे शहर पोलिस ठाण्यातील निरीक्षक राजकुमार मारूती उपासे यांची शहर वाहतूक शाखेत बदली करण्यात आली. नियंत्रण कक्षातील निरीक्षक देविदास किसन ढुमणे यांची साक्री पोलिस ठाण्यात तर साक्रीचे अजयकुमार भाईदास चव्हाण यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. नियंत्रण कक्षातील प्रकाश विश्वनाथराव मुंढे यांची चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात प्रभारी म्हणून तर मोहाडी पोलिस ठाण्यातील सतीश गोराडे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. दरम्यान, जिविशा शाखेतील सहाय्यक निरीक्षक विलास नानाजी ठाकरे यांची मोहाडी पोलिस ठाण्यात तर पिंपळनेरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंजाबराव राठोड यांची शहर वाहतूक शाखेत तसेच नियंत्रण कक्षातील सहाय्यक निरीक्षक दिलीप नामदेव खेडकर यांची पिंपळनेरला बदली करण्यात आली.

