पंतप्रधानांनी राबवलेल्या योजनांमधून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावले

महासंपर्क अभियानप्रसंगी रावेर विधानसभा क्षेत्र प्रमुख अमोल जावळे


रावेर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने 9 वर्षात सामान्य नागरीकांच्या हिताच्या अनेक योजना प्रभावीपणे राबविल्याने जनता सरकारच्या कामाबाबत समाधानी आह,े असे मत भाजपचे रावेर विधानसभा क्षेत्र प्रमुख अमोल जावळे यांनी व्यक्त केले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
महा जनसंपर्क अभियान अंतर्गत रावेर लोकसभा मतदार संघाच्या पत्रकार परीषद संमेलन कार्यक्रमात ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. रावेर बाजार समितीच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. व्यासपीठावर किसान मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुरेश धनके, रावेर लोकसभा निवडणुक प्रमुख नंदकिशोर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, पद्माकर महाजन, रावेर लोकसभा संयोजक सुनिल पाटील, तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, पंचायत समितीचे माजी सभापती जितू पाटील, पी.के.महाजन, पत्रकार परीषद संमेलन संयोजक वासुदेव नरवाडे, , तालुका सरचिटणीस सी.एस.पाटील, महेश चौधरी, जुम्मा तडवी, दिलीप पाटील, हरलाल कोळी, संदीप सावळे सुनील पाटील उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या योजनांमधून शेतकर्‍यांना आधार
केंद्र सरकारने गेल्या नऊ वर्षाच्या काळात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहेत तसेच शेतकर्‍यांच्या हिताच्या अनेक योजना राबवून शेतकर्‍यांना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे, असे मत सुरेश धनके यांनी व्यक्त केले. महिला, सर्वसामान्य जनता डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत असून यामुळे विकासाचा आलेख उंचावला आहे, असे पद्माकर महाजन म्हणाले. योजना मोठ्या प्रमाणावर राबविल्या जातात मात्र या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत माध्यमांनी पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन नंदकिशोर महाजन यांनी केले. सूत्रसंचलन वासुदेव नरवाडे यांनी तर आभार तालुका सरचिटणीस सी.एस.पाटील यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !