फेसबुकवर मंत्री गिरीश महाजनांची बदनामी : अज्ञाताविरोधात गुन्हा
Defamation of Minister Girish Mahajan on Facebook : A crime against anonymity जळगाव : फेसबुकवरील आम्ही वारकरी नावाच्या पेजवर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची बदनामी केल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.
फेसबुकवर मंत्र्यांची बदनामी
अरविंद देशमुख (42, रा.जळगाव) यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार मंगळवार, 18 रोजी संध्याकाळी सात वाजता देशमुख हे फेसबुक पेज पाहत असताना आम्ही वारकरी नावाच्या पेजवर भाजप नेते व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरोधात भादंवि कलम 499 व 500 प्रमाणे गुन्हा दाखल केला.

