Ayush Prasad is the new Collector of Jalgaon आयुष प्रसाद जळगावचे नूतन जिल्हाधिकारी
Ayush Prasad is the new Collector of Jalgaon जळगाव : जळगाव जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची बदली झाली असून त्यांच्या जागी पुणे जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे बदलून येत आहेत. राज्यातील 41 अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवार, 21 रोजी काढण्यात आले असून त्यात जळगाव जिल्हाधिकार्यांचीही बदली करण्यात आली आहे.
वर्षभरापूर्वीच झाली होती नियुक्ती
राज्य शासनाने आयएएस अधिकार्यांच्या बदल्या केल्या असून यात अमन मित्तल आणि डॉ.पंकज आशिया यांचा समावेश आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी अमन मित्तल यांनी 30 सप्टेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी पदाची धुरा सांभाळली होती. यानंतर त्यांच्या येथील कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण झाले नसतांनाच आज त्यांची बदली करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच जिल्हाधिकार्यांची बदली झाली असून त्यांच्या जागी पुणे जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी असलेल्या आयुष प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली.

जळगाव सीईओंची बदली
जळगाव जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांची देखील बदली झाली आहे. त्यांना आता यवतमाळ येथील जिल्हाधिकारीपदाची धुरा मिळाली आहे. यामुळे ते देखील जळगावातून जात आहे. तर त्यांच्या जागा गडचिरोली येथील अंकित या आयएएस अधिकार्याची नियुक्ती करण्यात आली.
