धुळ्यात एलसीबी अॅक्शन मोडवर : एक लाखांच्या गुटख्यासह दोघे जाळ्यात
चौकडीविरोधात देवपूर पोलिसात गुन्हा : गुटखा तस्करांमध्ये खळबळ
LCB on action mode in Dhule : Two in net with gutka of one lakh धुळे : कारद्वारे गुटख्याची वाहतूक करणार्या दोघांच्या धुळे गुन्हे शाखेने एका मुसक्या आवळत एक लाख दोन हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला असून अडीच लाख रुपये किंमतीची कार जप्त करण्यात आली. याप्रकरणी देवपूर पोलिसात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मोहम्मद अली जोहर मोहम्मद फारूक अन्सारी व त्याचा भाऊ, मोहम्मद ईक्बाल मोहम्मद फारूक अन्सारी, अन्सारी अबू सुफियान महंम्मद ईकबाल, मोहम्मद रब्बानी मोहम्मद ईकबाल अन्सारी (सर्व रा.देवपूर, धुळे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त
चारचाकी (एम.एच.18. टी.1825) मधून गुटख्याची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला निर्देश दिल्यानंतर देवपुरातील अंदरवाली मशिद भागात पोलिसांनी कारवाई करीत 84 हजार 150 रुपयांचा विमत पान मसाला, 18 हजार 800 रुपयांचा पान मसाला आणि दोन लाख 50 हजार रुपयांची कार असा एकूण 3 लाख 52 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांनी शुक्रवारी रात्री 11 वाजता देवपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार चार जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत, प्रकाश पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक शाम निकम, कर्मचारी शशिकांत देवरे, मुकेश वाघ, चेतन बोरसे, प्रशांत चौधरी, प्रल्हाद वाघ, जितेंद्र वाघ, हर्षल चौधरी आदींच्या पथकाने केली.




