सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात नागरीकांवर मोफत उपचार : राज्य मंत्री मंडळाचा निर्णय
Free treatment for citizens in all public health department hospitals: Decision of the State Council of Ministers मुंबई : राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत नागरीकांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार आता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांमध्ये नागरीकांवर मोफत उपचार केले जातील. या निर्णयामुळे राज्यातील गरीब, गरजू रुग्णांना मिळाला मोठा दिलासा मिळण्याची आशा आहे.
आरोग्य मंत्र्यांच्या पाठपुराव्याला आले यश
गुरुवारी राज्य मंत्री मंडळाची बैठक झाली. या बैठकीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयात मोफत उपचार करण्यासंदर्भात निर्णय हा एकमताने घेण्यात आला. यामुळे राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकूण 2418 संस्था आहेत, या सर्व ठिकाणी निःशुल्क उपचार रुग्णांना मिळणार आहेत. या निर्णयामुळे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.

या ठिकाणी मिळणार आता मोफत उपचार
राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय, कॅन्सर हॉस्पिटल या ठिकाणी मोफत उपचार मिळणार आहेत. सध्या या सर्व रुग्णालयात वर्षभरात उपचार घेण्यासाठी सुमारे 2.55 कोटी नागरीक येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
