डोंगरकठोर्‍यात घरफोडी : 40 हजारांचे संसारोपयोगी भांडे लांबवले


Burglary in Dongarkathora : Household utensils worth 40,000 were recovered यावल : यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथे एका कुटुंबाच्या घराचे बांधकाम सुरू असताना कुटूंबाने घरातील भांडे व संसारोपयोगी साहित्य गोण्यांमध्ये भरून एका भाड्याच्या घरात ठेवले होते. चोरट्यांनी ही संधी साधली. 40 हजार रुपये किंमतीचे हे भांडे चोरी झाल्याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा
डोंगरकठोरा, ता.यावल येथे आंबेडकर नगरात अरुण लक्ष्मण तायडे यांचे घर आहे. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने त्यांनी मामा रवींद्र काळू सपकाळे यांचे घर भाड्याने घेतले असून या घरात आपले संसारोपयोगी संपूर्ण साहित्य गोण्यामध्ये भरून ठेवले आहे. बांधकाम सुरू असलेल्या शेजारील घरात ते कुटुंबासह राहत असून चोरट्यांनी नेमकी संधी साधत तायडे यांनी ठेवलेले त्यांचे संपूर्ण संसारोपयोगी साहित्य लांबवले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !