दोन पिस्टल व काडतुसासह मध्यप्रदेशातील संशयित शिरपूर पोलिसांच्या जाळ्यात
Madhya Pradesh suspect with two pistols and cartridges in Shirpur police net शिरपूर : शिरपूर शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोन गावठी पिस्टल व जिवंत काडतूस बाळगणार्या संशयिताच्या मुसक्या बांधल्या आहेत. राजेश दयाराम बोरसे (24, सरस्वती कॉलनी, सेंधवा, जि.बडवाणी, मध्यप्रदेश) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. शिरपूर बसस्थानकात ही कारवाई करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर शहर पोलिसांना बसस्थानकावर येणार्या एका संशयिताकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून संशयिताच्या मुसक्या बांधल्या. संशयिताच्या अंग झडतीत 55 हजार रुपये किंमतीचे दोन गावठी कट्टे व एक हजार रुपये किंमतीचे एक जिवंत काडतूस आढळल्याने ते जप्त करण्यात आले.
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे, शिरपूर शहर निरीक्षक ए.एस.आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे, उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, डीबी पथकातील हवालदार ललित पाटील, रवींद्र आखडमल, मनोज पाटील, विनोद आखडमल, गोविंद काळे, योगेश दाभाडे, विलास कोळी, आरीफ तडवी, मनोज दाभाडे, सचिन वाघ, प्रशांत पवार, भटू साळुंखे, मनोज महाजन, होमगार्ड मिथून पवार, राम भील, चेतन भावसार, शरद पारधी आदींच्या पथकाने केली.




