भारतीय संविधान सर्वोच्च : पोलीस दलाचा नावलौकीक वाढवा ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Supreme Constitution of India: Increase the size of the police force ; Deputy Chief Minister Devendra Fadnavis नाशिक : भारताचे संविधान हे सर्वोच्च असून सेवाकाळात कुठलाही पक्षपातीपणा जात, धर्म, पंथ, लिंगभेद न करता महाराष्ट्र पोलीस दलाचा नावलौकिक वाढविणारी सेवा बजावण्याची जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर आली आहे, हे लक्षात असू द्यावे, असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिला. महाराष्ट्र पोलिस अकादमीमधील प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांच्या सत्र क्र.122चा दीक्षांत सोहळा मोठ्या दिमाखात शनिवारी पार पडला. यावेळी 349 पुरूष व 145 महिला प्रशिक्षणार्थींनी पोलीस उपनिरीक्षक म्हणून शपथ घेतली. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. याप्रसंगी ते बोलत होते.
प्रलोभणाचे ठरू नका बळी : उपमुख्यमंत्री
फडणवीस पुढे म्हणाले, पोली अधिकारी म्हणून वंचित, गरजू, पिडित घटकांचे दु:ख संवेदना जागृत ठेवून समजून घेत त्यांना योग्य ती मदत देत कर्तव्य पार पाडावे. महाराष्ट्र पोलीस दल हे भारताचे सर्वात मोठे व गौरवशाली इतिहास असलेले दल आहे. या दलाचा नावलौकिक उंचावत आज पोलीस अधिकारी म्हणून घेतलेली शपथ कायम निभवावी. सेवाकाळात कुठल्याही प्रलोभनाचे बळी ठरू नये, असा मौलिक सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 494 नवनिर्वाचित पोलीस उपनिरीक्षकांना दिला.

