कोरेगाव-भीमा दंगलीचा तपास एनआयएकडे : गृहमंत्र्यांची तीव्र नाराजी


नवी दिल्ली : कोरेगाव-भीमा दंगलीचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्यात आल्याने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तीव्र निषेध करीत नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयाचा मी निषेध करतो, असे गृहमंत्री गोंदिया येथे म्हणाले आहेत. देशमुख यांनी ट्वीटवरही याचा निषेध नोंदवला आहे. कोरेगाव-भीमाची दंगल हे तत्कालीनफडणवीस सरकारने पोलिसांच्या मदतीने घडविलेले षड्यंत्र होते. दंगलीच्या मुख्य सूत्रधारांना पाठीशी घालून जनतेची दिशाभूल करण्याचा तो डाव होता, असा गंभीर आरोप करून, या प्रकरणाची कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली एसआयटीद्वारे चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !