आधी पत्रकाराला अश्लील शिविगाळ नंतर पाचोर्‍यातील भर चौकातच बेदम मारहाण


First, the journalist was verbally abused and then brutally beaten in Bhar Chowk in Pachora पाचोरा : पाचोरा शहरातील ध्येय न्यूजचे संपादक संदीप महाजन यांना अश्लील शिवीगाळ पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर पाटील यांनी केली होती शिवाय शिविगाळ केल्याबाबत दुजोरादेखील दिला होता. त्यानंतर कारवाई झाली नसतानाच आता बुधवारी सकाळी पत्रकारालाच भर चौकात मारहाण करण्यात आल्यानंतर विरोधकांनी या घटनेनंतर सरकारला जाब विचारत कायदा-सुव्यवस्था शिल्लक आहे का ? असा प्रश्न विचारला आहे.

तर स्वातंत्र्य सैनिकांच्या डोळ्यातून आले असेल पाणी
पाचोर्‍यातील पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला असून त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. रपवार म्हणाले की, पत्रकाराला फोनवर आई- बहिणी वरून शिवीगाळ करायची, मारण्याची धमकी द्यायची, दुसर्‍या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची .का ? तर त्याने विरोधात बातमी छापली. विशेष म्हणजे ज्या चौकात मारहाण झाली त्या चौकाला या पत्रकाराच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे नाव दिलेले आहे. ही घटना बघून स्वातंत्र्यासाठी झटणार्‍या स्वातंत्र्यसैनिकांच्या डोळ्यात देखील नक्कीच पाणी असेल असं त्यांनी म्हटलं.

सत्ताधार्‍यांकडून हीच अपेक्षा
लोकशाही मूल्यांना, स्वातंत्र्यासाठी झिजलेल्या कुटुंबांना देखील सन्मान नसतो का? हा प्रश्न आज सर्वसामान्य जनता विचारत आहे. सत्ताधार्‍यांकडून हीच अपेक्षा आहे, परंतु एका पत्रकाराला अशा प्रकारे मारहाण झाली असताना महाराष्ट्राच्या पत्रकारांनी साधा निषेध करण्याची हिंमत देखील केली नाही, हे मात्र नक्कीच अनपेक्षित आहे अशी नाराजीही रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.

सुसंस्कृत वारसा जपणे गरजेचे
लोकप्रतिनिधीने पत्रकाराला शिवीगाळ करणे उचित नाही. परंतु जे काही आज घडले, त्यांना रस्त्यात मारहाण केली हे अशोभनीय आहे. गुंडगिरीचे वातावरण पाचोर्‍यात झाले आहे. याचा निषेध आहे. पाचोरा तालुक्याचा इतिहास राजकीय सुसंस्कृतीचा आहे. मागच्या गोष्टीचे अनुकरण आपण केले पाहिजे. राजकीय वारसा जपला पाहिजे. पाचोर्‍यात याआधीही अनेक नेत्यांवर टीका झालीय, घाणेरड्या शिव्या देण्यात आल्या. त्यामुळे सर्वांनी सुसंस्कृत वारसा जपणे गरजेचे आहे अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावर केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !