भ्रष्टाचाराच्या नावाखाली जळगाव जिल्ह्यातील अधिकार्‍यांना आमदार खडसेंकडून ब्लॅकमेलिंग : आमदार मंगेश चव्हाण यांचा धक्कादायक आरोप


Blackmailing by MLA Khadsen to officials of Jalgaon district in the name of corruption: Shocking allegation of MLA Mangesh Chavan जळगाव : चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसेंवर धक्कादायक आरोप केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना ब्लॅकमेलींग करण्याचे काम आददार खडसे करीत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी करीत खडसेंमुळे जिल्ह्यातील एक हजार कोटींचे कामं थांबल्याचे ते म्हणाले आहेत.

खडसेंवर धक्कादायक आरोप
जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुर्नवर्सन मंत्री अनिल पाटील, खासदार उन्मेष पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, मनपा आयुक्त विद्या गायकवाड आदी उपस्थित होते. या बैठकीच्या सुरुवातीलाच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रखडलेल्या कामांबाबत मंगेश चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर कामांच्या मंजुरीचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविले असल्याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली. मंजुरी योग्य असतानाही केवळ खडसेंनी भ्रष्टाचाराचा नावाखाली ही कामं थांबविण्याचा घाट घातला असून, त्यातून अधिकार्‍यांची ब्लॅकमेलींग सुरु असल्याचे चव्हाणांनी सांगितले.

सत्ता असो वा विरोधात, खडसेंची ब्लॅकमेलिंग : मंत्री गिरीश महाजन
विकासाच्या कामात अडथळा आणण्याचे काम जुने असून, ते सत्तेत असतानाही ब्लॅकमेलींग करायचे आता सत्तेत नसतानाही त्यांची ब्लॅकमेलींग सुरु असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंवर केला. यासह बोरसे नामक बांधकाम विभागाच्या एका अधिकार्‍याला तब्बल 20 वर्ष आपल्या घरी पोसला असल्याचाही आरोप गिरीश महाजन यांनी केला. दुसर्‍यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतांना आपण स्वत: किती शुध्द हे त्यांनी सांगाव ?े असा टोलाही महाजन यांनी खडसेंना लगावला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !