रेल्वेचा ट्रॅफिक ब्लॉक : तीन तास प्रवासी स्थानकांवर ताटकळले

अप-डाऊन मार्गावर रेल्वे प्रवाशांचे हाल : जेवणासह पाणी नसल्याने प्रचंड हाल


Railway traffic block: Passengers were stuck at stations for three hours भुसावळ : भुसावळ विभागातील दुसखेडा स्टेशन येथे यार्ड रीमोल्डींगमध्ये अप- डाऊन लूप लाईनच्या कामासाठी शुक्रवारी विशेष ट्रॅफिक ब्लॉक जाहीर करण्यात आल्याने दुपारी दोन ते पाच वेळेत तीन तास प्रवासी चांगलेच घामाघूम झाले. विविध रेल्वे स्थानकावर पूर्व सूचनेप्रमाणे गाड्या थांबवण्यात आल्या असल्यातरी पाण्यासह जेवण नसल्याने प्रवाशांची चांगलीच दमछाक होताना दिसून आले. सायंकाळी पाच वाजेनंतर गाड्या इच्छितस्थळी मार्गस्थ झाल्याने रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला.

अप मार्गावर या स्थानकावर थांबवल्या गाड्या
शुक्रवारी अप मार्गावरील सीतापरू-एलटीटी एक्सप्रेस सावदा स्थानकावर तीन तास, वाराणसी-म्हैसूर एक्स्प्रेस निंभोरा येथे 2.55 तास, (11072) वाराणसी-लोकमान्य टिळक कामायनी एक्स्प्रेस व सचखंड एक्स्प्रेस, कर्नाटका एक्स्प्रेस या गाड्या रावेर स्थानकावर थांबविण्यात आल्या तर गोरखपूर-पुणे एक्सप्रेस वाघोडा स्टेशनवर, अमृतसर-मुंबई एक्स्प्रेस ही गाडी बर्‍हाणपूर स्टेशनवर 1.30 तास थांबवण्यात आली. 22537 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस असीरगढ स्टेशनवर एक तास थांबवण्यात आली तर जयनगर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस ही गाडी चांदनी स्टेशनवर तर कटनी-भुसावळ एक्सप्रेस नेपानगर स्टेशनवर थांबवण्यात आली.

डाऊन मार्गावरील गाड्या
डाऊन मार्गावरील एलटीटी-गोरखपूर एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस दिब्रुगड एक्सप्रेस भुसावळ येथे 1.55 तास थांबवून ठेवण्यात आली तसेच मुंबई-लखनऊ एक्सप्रेस भुसावळ स्टेशनवर 1.45 तास थांबवण्यात आली तसेच म्हैसूर-वाराणसी एक्सप्रेस भादली स्टेशनवर 1.40 तास, सुरत-छपरा एक्सप्रेस जळगाव स्टेशनवर 1.40 तास थांबवण्यात आली होती. रेल्वे ब्लॉकमुळे एस.टी.बसेसला गर्दी वाढण्याचे संकेत होते मात्र प्रत्यक्षात तसे घडले नसल्याचे एस.टी.सूत्रांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !