धुळ्यात गावठी पिस्टलाच्या धाकावर दहशत : संशयित एलसीबीच्या जाळ्यात
Dhulai village terrorized by pistol fire : Suspect in LCB’s net धुळे : गावठी पिस्टल बाळगून दहशत निर्माण करणार्या संशयिताच्या धुळे स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या बांधल्या आहेत. भावेश मिलिंद जोशी (एकता नगर, देवपूर, धुळे) असे अटकेतील संशयिताचे नाव असून संशयित पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. चाळीसगाव रोडवरील एकता सर्कल (युनिटी सर्कल) येथे ही कारवाई करण्यात आली तर संशयिताच्या ताब्यातून 40 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला. संशयिताविरोधात चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, धुळे गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब सूर्यवंशी, पंकज विनायक खैरमोडे, योगेश दिलीप जगताप, किशोर ताराचंद पाटील, महेंद्र देवराम सपकाळ आदींच्या पथकाने केली.




