अंजाळे जवळील तापी प्रिस्ट्रेस्ड कंपनीतून 21 हजारांची इलेक्ट्रीक मोटार लांबवली
An electric motor worth 21 thousand was extended from Tapi Prestressed Company near Anjale यावल : यावल तालुक्यातील अंजाळे गावाजवळील तापी प्रिस्ट्रेस्ड कंपनीमधून अज्ञात चोरट्याने 21 हजार रुपये किंमतीच्या ईलेक्ट्रीक मोटारी चोरी केल्या. हा प्रकार सकाळी निदर्शनास आला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
अंजाळे, ता.यावल या गावाजवळ भुसावळ रस्त्यावर तापी प्रिस्ट्रेस्ड प्रोडक्ट्स लिमिटेड ही कंपनी आहे. या कंपनीमध्ये विविध कामासाठी तीन ईले.मोटारी लावल्या होत्या. यात एक 12, एक 10 व एक 5 हॉर्स पॉवरच्या अशा तीन इलेक्ट्रिकल मोटारी अज्ञात चोरट्याने चोरी केल्या. या तीन्ही मोटारीची किंमत 21 हजार रुपये आहे. मोटारी चोरी झाल्याचे सकाळी निदर्शनास आले तेव्हा या प्रकरणी कंपनीचे कर्मचारी सुनील काशीकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे.








