वरणगाव परीसरात अल्पवयीन मुलींच्या अंगावर फुले फेकून विनयभंग : दोघांना बेड्या
Throwing flowers on the bodies of minor girls in Warangaon area and molesting them: Two arrested वरणगाव : शाळकरी विद्यार्थिनींचा पाठलाग करीत त्यांच्या अंगावर फुले टाकून त्यांच्याशी अश्लील कृत्य करणार्या दोघांविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताना अटक करण्यात आली.
पाठलाग करीत विनयभंग
पीडीता व तिची मैत्रीण शाळेत जात असताना तीन चाकी स्कूटीवरील संशयित नेहमीच पाठलाग करीत अश्लील वर्तन करीत असल्याचा प्रकार विद्यार्थिनींनी कुटूंबियांनी सांगितल्यानंतर त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली. शनिवार, 26 रोजी सकाळी 11 वाजता संशयित पुन्हा दुचाकी (एम.एच.19 ए.यु.5449) ने विद्यर्थिनींचा पाठलाग करीत त्यांच्याशी अश्लील कृती करताना आढळल्यानंतर पीडीतेच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवल्यानंतर विनयभंग व पोस्कोन्वये संशयित रमेश चंद्रकांत पाटील आणि संतोष जानकीराम कोलते (दोन्ही रा. विठ्ठल मंदीर वेल्हाळे, ता.भुसावळ) यांच्याविरोधात गुनह दाखल करण्यात आला व संशयितांना अटक करण्यात आली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष आडसुळ करीत आहे.








