मुक्ताईनगरातील डॉ.निकिता मराठे एम.एस.अभ्यासक्रम विशेष प्राविण्याने उत्तीर्ण
मुक्ताईनगर : शहरातील डॉ.निकिता नारायणराव मराठे यांनी वैद्यकशास्त्रात पदव्युत्तर अभ्यासक्रमात एम.एस. (जनरल सर्जन) या अभ्यासक्रमात विशेष प्राविण्याने यश मिळवले आहे. रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे महात्मा गांधी मिशन कॅम्पस येथे पार पडलेल्या पदवीदान समारंभात त्यांना एमएस जनरल सर्जन या पदवीने सन्मानित करण्यात आले. प्रसंगी केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड, कुलपती कामलकिशोर कदम उपस्थित होते.
डॉ.निकिता मराठे या मुक्ताईनगर येथील ह्रदयरोग तज्ञ डॉ.एन.जी.मराठे यांच्या कन्या आहेत तर वैद्यकीय अधिकारी डॉ.गायत्री मराठे (एमबीबीएस) यांच्या भगिनी आहेत. मराठे कुटुंबाचे तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदन आहे. त्यांच्या घरात पुतण्या गणेश मराठे एमडी मेडिसीन हे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे तर मुलगा यश मराठे एम.बी.बी.एस. करीत आहे. जावई राहुल जाधव (एमबीबीएस) वैद्यकीय अधिकारी तर कुटुंबात सागर उदे एमबीबीएस, साक्षी उदे बीडीएस, रोहन उदे बीएमएस आहेत. कुटुंबातील वैद्यकीय भरारीत डॉ.एन.जी.मराठे व त्यांच्या पत्नी सुनंदा मराठे यांचे मोठे योगदान आहे

