हरताळा येथे किरकोळ वादातून कुटूंबियांना मारहाण : त्रिकूटाविरोधात गुन्हा


Beating up family over petty dispute in Hartala : Crime against trio मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा येथे किरकोळ वादातून कुटूंबाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवार, 21 ऑगस्ट रोजी वाल्मीक चौकात घडली. याप्रकरणी त्रिकूटाविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे हाणामारी प्रकरण
वसीम खान शब्बीर खान (36, हरताळा, ता.मुक्ताईनगर) यांनी मुक्ताईनगर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, 21 रोजी सकाळी 10 वाजता आठवडे बाजारातील आबीद किराणा स्टोअर्सवरून किराणा घेवून जात असताना वाल्मीक चौकात संशयित सय्यद शाहरूख सैय्यद लुकमान, सय्यद सलमान सैय्यद लुकमान व सय्यद लुकमान सैय्यद अमीर (तिघे रा.हरताळा) यांनी रस्त्यात अडवून मारहाण सुरू केली. आई वाद सोडवत असताना आईलादेखील शिविगाळ करीत मारहाण करण्यात आली तर पतीसह दवाखान्यात बहिण शबानामी शेख रहेमान जात असताना त्यांनी वाद सोडवण्याचा प्रयतन केल्यानंतर संशयित सैय्यद शाहरूखने लोखंडी रॉड डोक्यात मारून दुखापत केली तसेच भाऊ मोहसीन खान शब्बीर खान याला उजव्या खांद्यावर लोखंडी रॉड मारून दुखापत करण्यात आली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !