मनवेल रस्त्यावर अवैण गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त


Tractor transporting unarmed secondary minerals seized on Manvel road यावल : यावल तालुक्यातील मनवेल रस्त्यावर अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसुलच्या पथकाने पकडले. महसुलच्या गस्ती पथकाने ही कारवाई केली. ट्रॅक्टर मालकास अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी दंडाची नोटीस बजावण्यात आली.

कारवाईन उडाली खळबळ
मनवेल, ता.यावल या गावात ट्रॅक्टर (एम.एच.19 पी. 4244) व्दारे अवैण वाळू वाहतूक केली जात असताना भागात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर मंडळाधिकारी एम.एच.तडवी, फैजपूर तलाठी तेजस पाटील, यावल तलाठी ईश्वर कोळी, शरद सूर्यवंशी, विलास नागरे, वसीम तडवी, उमेश बाभुळकर, संदीप गोसावी यांचे पथक गस्तीवर असतांना त्यांनी ट्रॅक्टर थांबवले व तपासणी केली असता त्यात वाळू आढळली. चालकाकडे परवाना नसताना ट्रॅक्टर पंचनामा करून यावल तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. ट्रॅक्टर मालक नितीन कोळी यांना दंडाच्या संदर्भात नोटीस बजावण्यात आली आली.







 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !