भुसावळात रानभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद


Spontaneous response to the vegetable festival in Bhusawal भुसावळ : रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जे.सी.आय.ताप्ती व आयुर्वेद व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 27 ऑगस्ट रोजी शहरातील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवात जिल्हाभरातून शेतकर्‍यांनी विविध प्रकारच्या रानभाज्या जशा कर्टोली, रान माठ, कुर्डू, तरोटा, गुळवेल, रान केळी, अळू, यासारख्या अनेक भाज्या प्रदर्शन आणि विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या. या महोत्सवास नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दिड हजार भुसावळकरांची भेट
महोत्सवात दिड हजारांहून अधिक भुसावळकर नागरीकांनी भेट देऊन प्रदर्शन आणि खरेदीचा आनंद घेतला. कृषी विभागातर्फे प्रत्येक भाजीची माहिती, औषधी गुणधर्म आणि बनवण्याची रेसिपी प्रदर्शनात बुकलेट स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली. याप्रसंगी श्रीसाई कृषी विज्ञान केंद्रातर्फे सेंदिय खतांचे, तर केतन चौधरी यांनी मशरूमपासून बनवलेल्या विविध पदार्थांचे सादरीकरण केले. महोत्सवाचे उद्घाटन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्या रजनी सावकारे यांच्याहस्ते झाले. कार्यक्रमाचे नियोजन रोटरी रेलसिटीचे अध्यक्ष मनोज सोनार, सचिव तेजस नवगाळे, प्रोजेक्ट चेअरमन पुरुषोत्तम पटेल, अनिल साहनी, विकास पाचपांडे, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, तंत्र व्यवस्थापक आत्माचे प्रमोद जाधव यांनी केले. यशस्वीतेसाठी रोटरी रेलसिटीचे सर्व सदस्य, सर्व कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक यांनी परीश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !