भुसावळातील गजानन महाराज नगरातून दुचाकी लांबवली


Gajanan Maharaj in Bhusawal extended the bike from Nagar भुसावळ : शहरात दुचाकी चोरीचे सत्र थांबायला तयार नाही. कोळी समाज हॉलजवळील गजानन महाराज नगरातून चोरट्यांन्ही पुन्हा 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवल्याचा प्रकार उघडकीस आला असून शहर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकी चोरटे शहरात मुक्कामी
धनसिंग वामनसिंग पाटील (40, प्लोरा रेसीडेन्सी, कोळी समाज हॉलजवळ, भुसावळ) हे नोकरदार असून त्यांनी दुचाकी (एम.एच.19 डी.जी.8676) ही घराच्या पार्किंग एरीयात लावल्यानंतर चोरट्यांनी शनिवार, 26 रोजी दुपारी दिड वाजता संधी साधून दुचाकी लांबवली. याप्रकरणी पाटील यांनी शहर पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार संदेश निकम करीत आहेत.







 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !