जळगावातील जीर्ण ईमारतीखाली दबून महिलेचा मृत्यू : पाच तासांनी मृतदेह हाती
Woman dies after being crushed under a dilapidated building in Jalgaon: Body recovered after five hours जळगाव : शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील तीन मजली इमारत कोसळल्याची घटना मंगळवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेत राजश्री सुरेश पाठक (75) या वृद्धेचा मृत्यू झाला असून तब्बत पाच तासानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यंत्रणेला यश आले.
जीर्ण ईमारती नागरीकांच्या जीवावर
जळगाव शहरातील शिवाजी नगरात 74 वर्ष जुनी इमारत आहे. पाठक यांची ही इमारत आहे. या इमारतीमध्ये ते राहत नव्हते. या इमारतीचे मालक पाठक कुटुंबीय या ठिकाणी पूजा करण्यासाठी तसेच पाणी भरण्यासाठी येतात. त्यानुसार मंगळवार, 29 ऑगस्ट रोजी सकाळी पाठक कुटुंबीय पाणी भरण्यासाठी तसेच पूजा करण्यासाठी आले होते. याच दरम्यान सकाळी साडेआठ वाजता अचानक ही तीन मजली इमारत कोसळली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने महापालिकेचे कर्मचारी या ठिकाणी पोहोचले व बचाक बचाव कार्य सुरू केले. यात तीन जणांना वाचविण्यात यश आलं. तर एक जयश्री पाठक या वृध्द महिला इमारतीच्या ठिगार्याखाली अडकल्या. त्यांना वाचवण्यासाठी ही प्रशासनाचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान तब्बल 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर जयश्री पाठक यांना बाहेर काढण्यात आले. पाठक त्यांच्या पश्चात दोन मुलं आणि एक मुलगी असा परीवार आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.

पालिकेकडून देण्यात आली होती नोटीस
अनेक वर्षांपासून वर्षापासूनची ही जीर्ण इमारत होती ती रिकामी करण्याबाबत महापालिका प्रशासनाच्या वतीने संबंधित कुटुंबीयांना नोटीस देण्यात आली होती मात्र त्यानंतरही ती इमारत रिकामी करण्यात नाल्याने आज ही दुर्घटना घडली आहे. या इमारतीमध्ये एकूण चार जण होते त्यापैकी तीन जणांना वाचवण्यात यश आल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
