भुसावळात मिस्तरी काम करणार्‍यावर हल्ला


Attack on bricklayer in Bhusawal भुसावळ  :किरकोळ वादातून शहरातील मिस्तरी काम करणार्‍या तरुणावर हल्ला करण्यात आल्याची घटना शहरातील मिल्लत नगर भागातील किफायत मशिदीमागे रविवारी रात्री नऊ वाजता घडली.

संशयिताविरोधात गुन्हा दाखल
अब्दुल्ला शेख याकूब (25, मिल्लत नगर, भुसावळ) या तरुणाच्या तक्रारीनुसार, संशयित समीर कौसर पठाण (किफायत मशिदीजवळ, भुसावळ) याने त्यास धक्का दिला असता संशयिताला तू येथून निघून जा, मी तुझी मजाक करीत नाही, असे सांगितल्यानंतर संशयिताने सेंट्रींग कामाची फळी मारून दुखापत केली. तपास पोलीस नाईक रवींद्र भावसार करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !