भुसावळात गांजा ओढताना एकावर कारवाई
Action taken against one while smoking ganja in Bhusawal भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील मोकळ्या जागेवर गांजा चिलीमद्वारे ओढताना बाजारपेठ पोलिसांनी एकाविरोधात कारवाई करीत गुन्हा दाखल केला.
गांजा विक्रेत्यांवरही व्हावी कारवाई
संशयित समीर शहा नजीर शहा (23, पापानगर, भुसावळ) हा जामनेर रोडवरील एसीबीआय बँकेजवळ रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अंधारात गांजा ओढत असताना हवालदार यासीन सत्तार पिंजारी यांना आढळल्यानंतर संशयिताला ताब्यात घेण्यात आले व त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार महेश एकनाथ चौधरी करीत आहेत.








