मालोद गावातून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण


Abduction of 17-year-old minor girl from Malod village यावल : यावल तालुक्यातील मालोद येथून 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पीडीत अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
मालोद, ता.यावल या गावात 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या भावाकडे आली होती. ही मुलगी मूळची कांडवेल, ता.रावेर येथील रहिवासी असून भावाच्या घरी आलेल्या या अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने काहीतरी आमिष दाखवून फुस लावून पळवून नेले व तिचे अपहरण केले. हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी प्रारंभी मुलीचा शोध घेतला मात्र ती कुठे मिळून आली नाही तेव्हा यावल पोलीस ठाण्यात पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल. तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !