भुसावळात भारनियमन न थांबल्यास तीव्र आंदोलन : शिवसेनेचा इशारा


भुसावळ : शहरातील शिवाजी नगरासह आठवडे बाजार परीसर, विठ्ठल मंदिर वॉर्ड, वांजोळा रोड, श्री राम नगर, केळकर हॉस्पिटल परीसर व काही भागात वारंवार भारनियमन केले जात असल्याने नागरीक संतप्त झाले आहेत. विद्यार्थ्यांसह दुकानदारांचे प्रचंड नुकसान होत आहे. वीज कंपनीच्या कार्यालयात संपर्क साधल्यानंतर व्यवस्थित उत्तरे दिली जात नाहीत त्यामुळे नागरीकांच्या मनात अधिक रोष आहे शिवावय आगामी काळात गणपती उत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी असे सणयेत आहेत. ज्या तालुक्यात वीज निर्मिती केंद्र आहे त्याच तातुक्यात भारनियमन होत असल्याने आश्चर्य आहे. तालुकावासीयांवरचा अन्याय थांबवून नियमित 24 तास वीजपुरवठा करावा, अन्यथा शिवसेना उबाठा गटातर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पदाधिकार्‍यांनी दिला आहे.

निवेदन देताना यांची उपस्थिती
वीज कंपनी प्रशासनाला निवेदन देताना शिवसेना शहरप्रमुख दीपक धांडे, उपजिल्हा प्रमुख कैलास लोखंडे, तालुका संघटक बबलू बर्‍हाटे, दिलीप सुरवाडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख निलेश महाजन, युवा सेना तालुकाप्रमुख सुरज पाटील, युवा सेनेचे बबलु धनगर, उप शहरप्रमुख सोनी ठाकूर, शरद जयस्वाल, योगेश बागुल, स्वप्नील सावळे, संदीप पाटील, यश फलक, मनोज पवार, पिंटू भोई, शेख महमूद, सैयद आदीक, हेमंत बर्‍हाटे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !