गुंतवणुकीत नफ्याच्या आमिषाने भालोदच्या शेतकर्‍याला पावणेसहा लाखांचा गंडा


A farmer of Bhalod was extorted six lakhs by the lure of profit in investment यावल : भालोद, ता.यावल येथील शेतकर्‍याला गुंतवणूकीत नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अज्ञात दोन महिलांनी पाच लाख 65 हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात व्हॉटसअ‍ॅपधारक अज्ञात दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
यावल तालुक्यातील भालोदचे शेतकरी कांचनकुमार सुधाकर पिंपळे (47) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला असून शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. एप्रिल 2023 मध्ये त्यांना व्हॉटसअ‍ॅपच्या एका अनोळखी नंबरवरून फोन आला. यातील लक्ष्मी आणि संजना अशी दोघांनी नावे सांगितली. त्यांनी इगल व्हू ट्रेडींग नावाच्या व्हॉटसअ‍ॅप गु्रप तयार केला. त्यांनी शेतकर्‍याला गुंतवणूकीचे आमिष दाखवत विश्वास संपादन केला. त्यानंतर या स्कीमध्ये पैसे गुंतविण्याचे सांगून चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. शेतकर्‍याने विश्वास ठेवून वेळोवेळी त्यांनी सांगितलेल्या बँक खात्यात पाच लाख 65 हजार रुपये पाठविले परंतू त्यांना अद्यापपर्यंत कोणताही नफा मिळाला नाही. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकरी कांचनकुमार पिंपळे यांनी शनिवार, 2 सप्टेंबर रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर अज्ञात दोघा महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक बी.डी.जगताप करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !