स्वस्तात दुचाकी देण्याच्या बहाण्याने लाखोंचा गंडा : जळगावातील भामट्या शोरूम मालकासह तिघांना बेड्या
Extortion of lakhs on the pretext of giving cheap two-wheelers: Jalgaon Bhamtya showroom owner and three arrested जळगाव : शहरातील दादावाडी परीसरात राहणार्या एकाला स्वस्तात दुचाकी देण्याचा बहाणा करून फसवणूक करणार्या शोरूम मालकासह दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर भामट्या त्रिकूटाला शनिवारी दुपारी 12 वाजता अटक करण्या आली. शो-रुम मालक गिरीश चौधरी, सुमित सपकाळे व दीपक कोळी अशी अटकेतील भामट्यांची नावे आहेत.
अनेकांची फसवणकू झाल्याची शक्यता
शहरातील खोटे नगरात राहणारे चंद्रकांत सदाशिव इसे हे सेवानिवृत्त कर्मचारी असून त्यांची पत्नी या राज्य परिवहन महामंडळाच्या एरंडोल अगारात आगार व्यवस्थापक आहे. 2022 मध्ये दीपक उर्फ मनोज हिरालाल कोळी रा. कांचननगर याने इसे यांच्या पत्नीला कमी किंमतीमध्ये दुचाकी पाहिजे का अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी होकार दिल्यानंतर दीपक कोळी याने इसे दाम्पत्याची त्याचा मित्र सुमित राजू सपकाळे (पांझरापोळ टाकी) याच्याशी भेट घालून दिली. त्यानंतर दादावाडी परिसरात असलेल्या दत्त शो-रुमच्या मालकासोबत टायअप असून दुचाकी खरेदी करतांना जीएसटी लागणार नाही. त्यामुळे बाजार भावापेक्षा दहा ते बारा हजार रुपये कमी किंमतीमध्ये नवीन दुचाकी मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले तसेच नवीकोरी दुचाकी देखील मिळवून दिली. काही दिवस दुचाकी वापरल्यानंतर तुम्हाला तुमची गाडी आरटीओ पासिंग करुन देतो असे सांगत पुन्हा घेवून गेले. मात्र ती दुचाकी देखील अद्यापपर्यंत त्यांच्या ताब्यात दिलेली नसून त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले.

पासिंगच्या नावाखाली घेवून जात होते वाहने
सेवानिवृत्त कर्मचारी चंद्रकांत इसे यांनी वेळोवेळी दुचाकी खरेदी करुन देणारे सुमित सपकाळे व दीपक कोळी यांच्यासह दत्त शो-रुमचे मालक गिरीश चौधरी खात्यावर ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले आहे. या तिघांची फसवणुक करणारी टोळी आले. तसेच शो- रुमचा मालक गिरीश चौधरी हा विनापासिंग झालेल्या गाड्या दोघांना देतो, ती वाहने हे दोघे नागरिकांना कमी किंमतीमध्ये विक्री करतात. त्यानंतर त्या वाहनांची पासिंग करुन देतो असे सांगत ती वाहने पुन्हा आपल्या ताब्यात घेवून नागरिकांना गंडवित असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहेत.
