भुसावळातील कुविख्यात गुन्हेगार गुल्या खडसे स्थानबद्ध
Notorious criminals of Bhusawal, Gulya Khadse, Are located भुसावळ : शहरातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगार चेतन उर्फ गुल्या पोपट खडसे (29, हनुमान नगर, भुसावळ) यास जळगाव जिल्हाधिकार्यांनी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. खडसेविरोधात बाजारपेठ पोलिसात हाणामारीसह विविध गंभीर स्वरुपाचे सहा गुन्हे दाखल होते.
बाजारपेठ पोलिसांनी सादर केला प्रस्ताव
आरोपी गुल्या खडसे गुन्ह्यावर सुटल्यानंतर पुन्हा गुन्हे करीत असल्याने पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी एमपीडीचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्याकडे सादर केला होता. जळगाव गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील व सहकार्यांनी या गुन्ह्यावर कामकाज केल्यानंतर तो जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात आला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्थानबद्धतेचे आदेश पारीत करताच गुल्या खडसे याला मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.






आगामी काळात अर्ध्या डझन गुन्हेगारांवर कारवाई
भुसावळ शहरातील गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांकडून हद्दपार, एमपीडीएचे प्रस्ताव तयार करून पाठविले जात आहे. आगामी काळात शहरातील अर्ध्या डझहून अधिक गुन्हेगारांविरोधात हद्दपार व एमपीडीएची कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे प्रस्ताव कोणाच्या नावाचे आहे, याबाबत शहरात उत्सुकता लागली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कंबर कसली असून गुन्हेगारांवर कायद्याचा आधार घेत धडक कारवाई केली जात आहे.


