मी आत्महत्या करतोय ; बामणोदच्या तरुणाने टोकाच्या निर्णयापूर्वी भावाला दिली माहिती


I am committing suicide; Bamanod’s young man informed his brother before the final decision
यावल :
19 वर्षीय तरुणाने तापी पात्रात उडी घेत आत्महत्या केली. तत्वूर्वी हा निर्णय घेण्यापूर्वी भावाला फोन करून आत्महत्या करीत असल्याची माहिती दिल्याची घटना यावल तालुक्यातील बामणोद येथे रविवारी रात्री उशिरा घडली. देवेंद्र पंकज पाटील (19, इंदिरानगर, बामणोद) असे मयत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. फैजपूर पोलिसात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

तापी पुलावरून घेतली उडी
बामणोद गावातील रहिवासी असलेल्या देवेंद्र पाटील या तरुणाने रविवार, 3 सप्टेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास भुसावळ जवळील तापी नदीच्या पुलावरून उडी घेतली व तापी नदीच्या पुलावरून उडी घेतल्यानंतर जखमी झाल्यानंतर उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. तत्पूर्वी त्याने आपल्या भावास आत्महत्या केल्याची माहिती दिल्याचे समोर आले. आहे. या संदर्भात मयताचा भाऊ भूषण पंकज पाटील यांनी फैजपूर पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल गोकुळ तायडे करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !