नर्मदा परीक्रमा यशस्वी ः वरणगावात 261 नर्मदेश्वर शिवलिंगाचे वाटप


वरणगाव : ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठानतर्फे माँ नर्मदा परीक्रमा यशस्वी पूर्ण झाल्याने कुमारिका पूजन, भोजन आणि भंडारा कार्यक्रमाचे आयोजन वासुदेव नेत्रालयाच्या सुनियोजित जागेवर करण्यात आले. यावेळी येणार्‍या भाविकांना नर्मदेश्वर महादेव लिंग डॉ.पाटील दाम्पत्याच्या हस्ते भेट देण्यात आले.

भुसावळातील रहिवासी तथा वासुदेव नेत्रालय चे संचालक डॉ.नितु पाटील यांनी नुकतीच माँ नर्मदा माता परीक्रमा पूर्ण केली. त्या निमित्ताने डॉ. पाटील यांचे स्वागत समारंभ, कुमारीका पूजन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी येणार्‍या प्रत्येक भाविकाला श्रावण महिन्याचे औचित्य साधत, कायमस्वरूपी आठवण राहावी म्हणून 261 नर्मदेश्वर महादेव लिंगाचे वाटप करण्यात आले. यावेळी जवळपास 51 कुमारीकांचा पाद्यपूजन करून त्यांना भेटवस्तू देत प्रसाद भोजन देण्यात आले. महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.रवींद्र कुटे उपस्थित होते.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
रेवा कुटी या ध्यानधारणा वास्तूचे भूमिपूजन करण्यात आले. सोबत विविध वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनीदेखील डॉक्टर नितु पाटील यांचा शाल, श्रीफळ देत सत्कार केला. यशस्वीतेसाठी कैलास तावडे, कपिल राणे, साजन गवळी, योगेश मगरे, दीपक फेगडे, चेतन झोपे, सचिन इंगळे, सुयोग चौधरी, विवेक पाटील, निलेश खाचणे, रोहन भोई, सचिन महाजन, पराग कुरकुरे, प्रसन्न पाटील, पारस सरोदे, हर्षल बोलणारे, निलेश मालविया, महालक्ष्मी पाचपांडे सर्व मित्रमंडळींनी परीश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !