कुर्‍हेपानाचे गावातील सेवानिवृत्त प्राचार्यांच्या फार्म हाऊसमधून दहा हजारांची रोकड लांबवली


Ten thousand cash was extended from the farm house of the retired principal of Kurhepanache village भुसावळ : भुसावळ तालुक्यातील कुर्‍हे पानाचे शिवारातील फार्म हाऊसच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दहा हजारांची रोकड लांबवल्याची घटना शनिवारी समोर आली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरीमुळे उडाली खळबळ
सेवानिवृत्त प्राचार्य दिलीपकुमार मदनलाल ललवाणी (63, रा.दत्तधाम, मदन तारा बिल्डिंग, भुसावळ) हे आपल्या परीवारासह वास्तव्यास आहेत. त्यांचे भुसावळ तालुक्यातील कुर्‍हे पानाचे शिवारात शेत गट नंबर 750 येथे फार्म हाऊस आहे. 1 सप्टेंबर सायंकाळी 5 वाजता ते 2 सप्टेंबर सकाळी 10 वाजेच्या दरम्यान त्यांच्या शेतातील फार्म हाऊस बंद असताना अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत लाकडी कपाटातील दहा हजारांची रोकड लांबवली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर दिलीपकुमार ललवाणी यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तपास हवालदार दीपक जाधव करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !