यावल शहरातून दुचाकी लांबवली


यावल : शहरातील बुरूज चौकाच्या पुढे असलेल्या नगीना मस्जिद बाहेर लावलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्याने लांबवली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

यावल शहरात चोरटे मुक्कामी
यावल शहरात बुरूज चौकाजवळ नगीना मशिदीत नमाज पठणासाठी खलील गंभीर तडवी (चितोडा) आले असता त्यांनी मशिदीच्या बाहेर दुचाकी (क्रमांक एम. एच.19 बी. एक्स. 7626) ही लावली मात्र मशिदीत ते नमाज अदा केल्यानंतर बाहेर आले असता त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आले. यावल पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली. तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार उल्हास राणे करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !