अवैध वाळू वाहतूक : साकेगाव शिवारात डंपर जप्त
Illegal sand transport: Dumper seized in Sakegaon Shiwar भुसावळ : अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्या डंपरवर महसूल प्रशासनाने कारवाई करीत डंपर जप्त केला. ही कारवाई सोमवारी पहाटेच्या सुमारास साकेगाव ग्रामपंचायतीच्या सर्वे क्रमांक चारवर करण्यात आली.
कारवाईने उडाली खळबळ
प्रांताधिकारी जितेंद्र पाटील व तहसीलदार निता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाकडून अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाई केली जात असून सोमवारी पहाटे डंपर जी.जे.18 ए.यु.7404 द्वारे अवैधरीत्या वाळू साठा होत असताना पथकाने सोमवारी पहाटे दोन वाजता धाव घेतल्यानंतर डंपर चालकासह मजुरांनी पळ काढला तर पथकाने दोन ब्रास वाळूसह डंपर ताब्यात घेत तहसील आवारात जप्त केल्याने अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्यांच्या गोटात खळबळ उडाली. दरम्यान, साकेगाव येथील डंपर मालकास दंडात्मक नोटीस बजावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मंडळ अधिकारी प्रफुल्ल कांबळे, भुसावळ शहर तलाठी पवन नवगाळे, वराडसीम तलाठी नितीन केले, वाहन चालक विलास नारखेडे, साकेगाव कोतवाल जितेश चौधरी, साकेगाव पोलिस पाटील गणेश भोई व तालुका पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.








